पुणे शहरातील या भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुणे शहरातील या भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद


महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहराच्या काही भागात 'फ्लो मीटर' बसविण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी 23 फेब्रुवारी शहरातील पेठा, मध्यवर्ती भागासह उपनगरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. शुक्रवारी 24 फेब्रुवारी दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

जुना होळकर जलशुद्धीकरण अंतर्गत एचई फॅक्टरी, अहिरेगांव, अतुलनगर परिसर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर, कोंढवे धावडे, उत्तमनगर, कोपरे, शिवणे, दत्तवाडी परिसार, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगगर परिसर, स्वारगेट परिसर, सिंहगड रस्त्यावरील रोहन कृतिका आणि लगतचा परिसर, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, नवी पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, कसबा पेठ, वानवडी, कोंढवा गावठाण, लुल्लानगर, साळुंखे विहार, ससाणेनगर, काळेबोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यनदकर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, रामटेकडी, गोंधळेनगर, रामटेकडी औद्योगिक परिसर, माळवाडी, भोसले गार्डन, आकाशवाणी परिसर, लक्ष्मी कॉलनी, महादेव नगर, मगरपट्टा या भागाचा पाणीपुरठा गुरुवारी बंद राहणार आहे.
SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook