पुणेकरांच्या खिशाला झळ बसणार, कारण स्वस्तातला प्रवास महाग होणार, ५ रुपयांचं तिकीट

पुणेकरांच्या खिशाला झळ बसणार, कारण स्वस्तातला प्रवास महाग होणार, ५ रुपयांचं तिकीट


पुणे उपनगरात असेल्या डेपोपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर जाणाऱ्यांसाठी पाच रुपये तिकीट असलेली अटल सेवा सुरू करण्यात आली होती. ५६ मार्गावर १४३ फेऱ्या याअंतर्गत सुरू होत्या. पण, पीएमपीला काही मार्गावर प्रवासी व उत्पन्न कमी असल्याचे आढळून आले.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) उपनगर परिसरात ५६ मार्गावर पाच रुपयांमध्ये सुरू असलेली अटल सेवा (डेपो कोअर सिटी) तोट्यामुळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आता सुरू असलेल्या २८ मार्गावर नियमित तिकीटदराप्रमाणे सेवा दिली जाणार आहेत. तर, जास्त तोट्यातील २८ मार्ग बंद करण्यात आले आहेत. ही सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला थोडीशी झळ बसणार आहे.

पीएमपीकडून शहर व उपनगर परिसरात २५ ऑक्टोंबर २०२० मध्ये पाच किलोमीटर अंतरासाठी पाच रूपये तिकीट अशी अटल सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर शहराच्या मध्य भागात दस मे बस ही पुण्यदशम बसची सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे शहराच्या मध्यवस्तीमधील अटक सेवा बंद करण्यात आली होती.

पण, उपनगर परिसरात असलेल्या डेपोपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर जाणाऱ्यांसाठी ही पाच रुपये तिकीट असलेली अटक सेवा सुरू होती. या सेवेच्या ५६ मार्गावर १४३ फेऱ्या सुरू होत्या. पण, पीएमपीने या मार्गाची पाहणी केली. त्यावेळी अटल सेवा सुरू असलेल्या बसचे काही मार्गावर प्रवासी व उत्पन्न कमी असल्याचे आढळून आले. पीएमपीची संचलन तूट वाढत असल्यामुळे पीएमपी सध्या सुरू असलेल्या ५६ पैकी २८ मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर, ज्या मार्गावर प्रवासी संख्या चांगली आहे. अशा २८ मार्गावर पीएमपीच्या ५१ फेऱ्या सुरू राहणार आहेत. पण, या बसला आता प्रवाशांना नियमित तिकीट दराप्रमाणे (टप्प्यानुसार) तिकीट द्यावे लागणार आहे. पीएमपीने १९ फेब्रुवारी पासून हा निर्णय लागू केला आहे. या निर्णयामुळे पीएमपीची संचलन तूट कमी होणार आहे. मात्र, प्रवाशांच्या खिशाला थोडीशी झळ बसणार आहे.
SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook