अखिल औंधरोड डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी छ. शिवाजीनगर मतदारसंघ यांनी आयोजित केलेल्या विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिर या कार्यक्रमास उपस्थित राहत बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले व सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच आरोग्य शिबिराची पाहणी केली.याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक अतुल आगाळे, अर्चना वैद्य, अभिजित वाघमारे, सचिन शेलार तसेच इतर सहकारी उपस्थित होते.
Tags:
Pune