प्रशांत दामले मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी; आशिष शेलारांनी पाठिंबा दिलेल्या कलाकाराचा पराभव

प्रशांत दामले मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी; आशिष शेलारांनी पाठिंबा दिलेल्या कलाकाराचा पराभव


अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची नियामक मंडळाची (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) निवडणुक नुकतीच पार पडली. याचा निकाल आज अर्थात १६ मे रोजी निकाल जाहीर झाला आहे. जाहीर झालेल्या निकालात रंगकर्मी पॅनलचा विजय झाला असून प्रसिद्ध नाटयकर्मी, ज्येष्ठ कलावंत प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. अशी माहिती नाट्यपरिषदेच्या वतीनं देण्यात आली आहे.
प्रशांत दामले या निवडणूकीत प्रचंड बहुमताने विजय झाले असून नवनाथ कांबळी यांचा पराभव केला आहे.

तर खजिनदारपदी दोडके सतीश यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी गढेकर सुमन यांची निवड झाली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी याविषयी माहिती दिली आहे. इंदुलकर समीर, पोळके दिलीप, ढगे सुनील यांची निवड कार्यकारिणीवर झाली आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची नियामक मंडळाच्या कार्यकारिणीत तेरा पैकी अकरा सदस्य निवडून आले आहेत. या कार्यकारिणीत संजय देसाई, मालपेकर सविता, रेगे दीपक, सुशांत शेलार, शिंगाडे विशाल, विजय साळुंके, चौगुले विजय, महाजन गिरीष, संजय राहते, क्षिरसागर दीपा, पाटील संदीप यासह इतर सदस्यांचा समावेश आहे.

सह- कार्यवाहपदात तीन पदे होते, पण निवडणूकीच्या रिंगणात सहा उमेदवार उतरले होते. त्यात समीर इंदूलकर, दिलीप पोरके आणि सुनील ढगे यांच्या नावाचा समावेश होता. तर प्रमुख कार्यवाहपदी भुरे अजित गोपीनाथ यांची निवड करण्यात आली आहे. खजिनदारपदी लोटके सतीश यांची प्रचंड बहुमताने निवड करण्यात आली आहे. सोबतच उपाध्यक्षपदी (प्रशासन) त्यात गढेकर सुमन यांची निवड झाली असून अविनाश नारकर यांचा पराभव झाला आहे. भाऊसाहेब भोईर यांची उपाध्यक्ष (उपक्रम) यांची बिनविरोध निवडून आले आहेत. (Marathi Actors)
SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook