मराठी चित्रपट मालिका अभिनेत्री मीरा जोशी हिच्या गाडीला नुकताच अपघात झाला आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरून जात असताना मिराच्या गाडीला अपघात झाला. गाडीवरचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा कठड्यावर तिची गाडी जोरदार आदळली. यात तिच्या गाडीचे खूप मोठे नुकसान झाले असले तरी मात्र या आपघातातून मीरा सुखरूप बचावलेली पाहायला मिळत आहे. या अपघातात मिराला कुठेही दुखापत झाली नाही मात्र आपल्याला ज्या गाडीने वाचवलं त्या तिच्या सखीचे तिने आभार मानले आहेत. मिराने स्वतःच तिच्या या अपघाताची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अपघात झालेल्या तिच्या या गाडीचे किती नुकसान झाले आहे हे तिने या व्हिडिओतून दाखवले आहे. गाडीचे भरपूर नुकसान झाल्याने तिची गाडी टो करण्यात आली असून ती आता दुरुस्तीसाठी पाठवण्यात आली आहे. मात्र आपल्या या सखीला निरोप देताना मीरा थोडीशी भावुक झालेली पाहायला मिळते. ऊन ,वारा , पाऊस अशा कुठल्याही परिस्थितीत तिच्या या गाडीने तिला कायम साथ दिली आहे. ९० हजार मैल प्रवास केलेल्या या सखीला निरोप देताना मीरा थोडीशी भावुक होते पण आपण या सखीला लवकरच भेटू अशी आशा ती बाळगून आहे. मिराने अपघाताची बातमी शेअर करताच सेलिब्रिटींनी तिला काही लागलं तर नाही ना याची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
अर्थात याचे उत्तर तिने अगोदरच दिल्याने तिचे चाहतेही निश्चित झाले आहेत मात्र सोबतच तिला काळजी घेण्याचाही सल्ला दिला जात आहे. मीरा जोशी ही अभिनत्रि असण्यासोबतच उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे. आपल्या नृत्याने तिने अगोदर रेकॉर्ड बनवले आहेत. चालू द्या तुमचं, शिवा, वृत्ती, लाल बत्ती, माझ्या बायकोचा प्रियकर अशा अनेक चित्रपटातून मीरा जोशी महत्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे. मुंबई पुणे महामार्गावर पावसावळ्यात जास्त अपघाताचे प्रमाण वाढते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
Tags:
Entertainment