मराठी चित्रपट, मालिका अभिनेत्री आणि आई कुठे करते मालिका फेम राधा सागरने हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणाची घोषणा करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. राधाने सागर कुलकर्णीसोबतचा एक क्युट व्हिडिओ शेअर करत तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी तिने दिली होती. राधाने शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन देत तिने म्हटले आहे की, “आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण घोषित करण्याचा सर्वोत्तम दिवस”. राधाने सर्वांना आश्चर्यचकित केले, जेव्हा तिने जाहीर केले की लवकरच ती आई होणार आहे. आज राधा सागर हिने काल पार पडलेल्या डोहाळे जेवणाचे फोटो देखील चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
तिच्या डोहाळे जेवणाच्या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. आयुष्यातील ह्या सुंदर खानाची खास आठवणीत तिने टिपलेले साठवून ठेवताना ती पाहायला मिळाली. आई कुठे काय करते फेम अभिनेत्री राधा आणि सागर कुलकर्णी एकत्र काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले. राधाने काही वर्षे त्याच्यासोबत काम केल्यानंतर सागर कुलकर्णीशी लग्न केले. अनेक वर्षांच्या वैवाहिक आनंदानंतर, हे जोडपे आता त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे., राधा आई कुठे काय करते मालिकेत अंकिताच्या भूमिकेत झळकली होती. सुंदरा मन मध्य भरली या मालिकेतूनही तिने महत्वाची भूमिका साकारली होती.
लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या राधाने ललित कला केंद्र मधून अभिनयाचे धडे गिरवले होते. कन्यादान, लक्ष्य, भिरकीट, कंडिशन्स अप्लाय अशा मालिका चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. गेल्या काही दिवसांपासून ती अभिनय क्षेत्रापासून थोडीशी बाजूला होती. होणाऱ्या बाळाच्या आगमनाच्या तायरीमुळे राधाने या क्षेत्रातून काढता पाय घेतलेला पाहायला मिळतो त्यामुळे आता अजून काही वर्षे तरी ती या क्षेत्रापासून बाजूला राहणार हे निश्चित झाले आहे. सध्या आपल्या पहिल्या अपत्याच्या प्रतीक्षेत असलेले राधा आणि सागर लवकरच आई बाबा होण्याचा आनंद अनुभवणार आहेत त्यासाठी त्यांचे सेलिब्रिटींकडून अभिनंदन केले जात आहे.
Tags:
Entertainment