लेकींच्या सुरक्षेसाठी महाविकास आघाडी मैदानात शरद पवारांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे आंदोलन

लेकींच्या सुरक्षेसाठी महाविकास आघाडी मैदानात शरद पवारांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे आंदोलन


बदलापूरसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आपल्या लेकींवर अत्याचार होत असताना राज्यातील सत्ताधारी मात्र केवळ राजकारणात व्यस्त आहेत असा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीने संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात आले. पुण्यातही खा. शरद पवार व खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे आंदोलन झाले.

राज्याचे मुख्यमंत्री सर्वसामान्य नागरिकांवर राजकारणाचा शिक्का मारताय, सपशेल अपयशी ठरलेले गृहमंत्री गुन्हेगार सोडून आंदोलकांना अटक करताय, दुसरे उपमुख्यमंत्री तर आपल्या गुलाबी स्वप्नातच व्यस्त आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

अशा परिस्थितीत लोकनेते आदरणीय श्री. शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या लेकींसाठी महाविकास आघाडीची वज्रमुठ घट्ट झाली. महाराष्ट्राच्या लेकींसाठी आम्ही लढणार हा निर्धार करत महाविकास आघाडीच्या वतीने आज एक तासाचे मुक आंदोलन करण्यात आले.

श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वात व खा.सौ.सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे व गजानन थरकुडे, सौ.वंदनाताई चव्हाण, श्रीमती दीप्तिताईं चौधरी, श्री.जयदेवराव गायकवाड़, श्री.जगन्नाथ शेवाले, आमदार श्री. रवींद्र धंगेकर श्री. मोहन जोशी, चंद्रकांत मोकाटे, रमेश बागवे, महादेव बाबर, बाळासाहेब शिवरकर यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.

या आंदोलनात महात्मा गांधींच्या रघुपति राघव राजाराम या प्रार्थनेचे सामूहिक वाचन केले व लोकनेते आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील लेकींच्या सुरक्षेची प्रतिज्ञा करत आंदोलनाची सांगता झाली.



SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook