190 वर्ष जुना अमृतांजन पूल तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

190 वर्ष जुना अमृतांजन पूल तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील १९० वर्षे जुना अमृतांजन पूल लॉकडाऊनच्या काळात पाडण्यात येणार आहे. लॉकडाऊनमुळे या मार्गावरील वाहनांची संख्या घटल्यानं ४ एप्रिल ते १४ एप्रिल या काळात  अमृतांजन पूल पाडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं घेतला आहे. 

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर खंडाळा घाटात  १८३० साली हा पूल बांधण्यात आला होता. ब्रिटीश कालावधीत कॅप्टन ह्युजनस यांनी घाटाचं बांधकाम केलं होतं. आता नव्या मुंबई-पुणे महामार्गामुळे या पुलाचा फारसा वापर होत  नव्हता, अशी माहिती रायगड पोलिसांनी दिली.  मात्र या पुलाच्या खाली मोठी अवजड वाहानं अडकून  असायची त्यामुळे वाहतूक कोंडी व्हायची. हा पूल पाडल्यानं ही कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. 


190 वर्ष जुना अमृतांजन पूल तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook