कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुंबईसाठी तर धोक्याची घंटा वाजत आहे. आजच्या एकाच दिवशी मुंबईत तब्बल १०३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्राचा आकडा ७४८ वर पोहोचला आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. तर राज्यात सर्वाधिक रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. महाराष्ट्रात मुंबईसह एकूण ११३ रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत ५६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
राज्यात आता सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. एका दिवसांत सर्वाधिक रुग्ण हे आज (रविवार) आढळून आले आहेत. कोरोनामुळे मुंबईत आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने यावर शिक्कामोर्तब केला आहे.
आज मुंबईत आढळून आलेल्या १०३ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५५ अहवाल हे खासगी लॅबमधून आलेले आहेत. ३१ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. पण तो त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आला. राज्यात मुंबई आणि पुणेमध्ये विषाणू बाधितांचा आकडा हा वाढत चालला आहे. मुंबई हे कोरोना विषाणूचं हॉटस्पॉट बनलं आहे.
Tags:
Mumbai