कोरोना व्हायरसच्या देशभरात पसलेल्या विळख्यामुळे ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सगळेच कामधंदे बंद आहेत. लॉकडाऊन मुळे साधारण कुटुंबातील लोकांना काही फरक पडला नसला तरी याकाळात रोजंदारी वर काम करणाऱ्या कामगारांचे प्रचंड हाल झाले आहेत. अशावेळी घरी बसून तरी काय करायचे हा प्रश्न अनेकांच्या समोर आहेच.
पण या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राच्या वाशीम जिल्ह्यातील एका दांपत्याने शोधून काढले. वाशीम मधील या पती-पत्नीने घरी बसून आपल्याला कंटाळा येऊ नये म्ह्णून घराच्या अंगणात विहीर खोदायचे ठरवले. त्यांच्या या अथक प्रयत्नांना तब्बल २१ दिवसात २५ फुटांची विहीर खोदून तयार झाल्यांनतर त्या विहिरीला पाणी देखील लागले आहे.
महाराष्ट्रारतील काही जिल्ह्यांमध्ये नेहमीप्रमाणे दुष्काळाचे चित्र हे काही नवीन नाही. वाशीम जिल्ह्यात ही कडाक्याच्या उन्हाळ्यात पाण्याचे संकट नेहमीच असते. अशातच गावात सुरु असलेली नळ जल योजना ठप्प झाली असताना आता विहिरीतील पाण्याचा गावकऱ्यांना सुद्धा उपयोग होणार आहे. आता या विहिरीमुळे मात्र एन उन्हाळा सुरु असताना या पती पत्नीला दिलासा मिळाला आहे. तसेच गावातील प्रत्येक जण या दांपत्याचे कौतुक देखील करत आहेत.
Tags:
Maharashtra