जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाचं संकट अधिक गंभीर रुप घेईल अशी भीती व्यक्त केलीय. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयेसस यांच्या इशाऱ्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. आफ्रिकी देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने त्यांनी ही चिंता व्यक्त केल्याचं बोललं जातंय. आफ्रिकी देशांमध्ये वैद्यकीय सुविधांची वाणवा आहे.
त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त होतंय. जगभरात २५ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झालीय. तर १ लाख ६० हजारांहून अधिक जणांचा बळी गेलाय. कोरोनाशी लढण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या सूचनांचं पालन सर्वच देश करत आहेत. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेल्या भीतीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे.
Tags:
Maharashtra