मुंबई : काही दिवसापूर्वी मुंबईतील १३ पत्रकारांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातील १३ पत्रकारांचे कोरोना अहवाल आज निगेटिव्ह आले आहे. या सर्व पत्रकारांना गोरेगावच्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांना आज घरी सोडण्यात आले असून घरातच १४ दिवस क्वारंटाईन राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने पत्रकारांसाठी मुंबईत कोरोना चाचणी शिबीराचे आयोजन केले होते.
त्याच पार्श्वभूमीवर ५३ पत्रकारांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. महापालिकेने १६ ते, १७ एप्रिलला विशेष शिबिरात १७१ पत्रकारांची चाचणी होती. त्याचा अहवाल २० एप्रिलला प्राप्त झाला होता. त्यापैकी ५३ पत्रकारांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे स्प्ष्ट झाले होते. तर अनेकांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना गोरेगाव येथील हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते.
तर काहींना मुंबईच्या सेवन हिल्स रुग्नालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, २४ एप्रिल रोजी पुन्हा या पत्रकारांची चांचणी घेण्यात आली. त्यातील ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
Tags:
Mumbai