कोरोनाचा धोका टाळण्यासाठी ३ मीटर अंतर पुरेसे? वाचा संशोधनातून काय सिद्ध झालंय…

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी ३ मीटर अंतर पुरेसे? वाचा संशोधनातून काय सिद्ध झालंय…

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज कोरोना लढाई जिंकण्यासाठी ३ मीटर अंतर राखण्याचे आवाहन केले. मात्र ३ मीटर अंतर राखल्याने कोरोनाचा धोका टाळता येतो का? जाणून घ्या कोरोनाबाबतच्या संशोधनातून…

नवी दिल्ली – करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एकमेकांपासून किमान एक मीटर अंतरावर थांबण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) आणि अमेरिकेच्या “सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल ऍन्ड प्रिव्हेन्शन'(सीडीसी)कडून दिल्या गेल्या आहेत. मात्र हे 1 मीटरचे अंतर पुरेसे नाही. प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खोकणाऱ्या अथवा शिंकणाऱ्या व्यक्‍तीपासून किमान 8 मीटर दूर थांबले पाहिजे, असे नव्या संशोधनामध्ये म्हटले आहे. करोनाचा विषाणू 8 मीटर दूरपर्यंत हवेतून प्रवास करू शकतो, असे “जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात म्हटले आहे.

“डब्लूएचओ’ आणि “सीडीसी’ने सांगितलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजना कालबाह्य झालेल्या मॉडेलवर आधारित आहे. खोकला, शिंक अथवा उच्छवासाद्वारे जो वायू उत्सर्जित होतो, त्याच्या आधारे ही 1 मीटरच्या अंतराची सूचना करण्यात आली आहे. मात्र कमी-अधिक आकाराचे तुषार, थेंब 23 ते 27 फूटांपर्यंत किंवा 7-8 मीटर दूर जाऊ शकतात आणि त्यातून या विषाणूंचा फैलावही होऊ शकतो, असे एमआयटीच्या सहप्राधापिका लिडिया बौरोइबा यांनी म्हटले आहे.

थेंब लहान किंवा मोठे अशा दोन स्वरुपात असतात, असे जुन्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मानले जात असे. मात्र हवेच्या लहरींवरून या थेंबातील अनेक लहान कण अधिक दूरवर प्रवास करतात. दमट आणि समउष्ण वातावरणात हवेच्या प्रवाहाबरोबर वाहणाऱ्या या थेंबांचे आयुष्य सेकंदांच्या अंशापासून मिनिटांपर्यंत वाढू शकते. उच्छवासाद्वारे हे दूषित कण हवेत पसरले की काही तासांपर्यंत तरंगत राहू शकतात, असेही बौरोइबा यांनी म्हटले आहे.

SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook