बोपोडी : बोपोडी येथील खेडेकर रूग्णालयाच्या सी. सी. सी सेंटर मध्ये दाखल एका तरुणांने तिसर्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रकार घडला आहे. ही घंटना आज (गुरूवार) रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वीरेंद्र चंद्रकांत जक्कल, वय 24 वर्षे, रा. खडकी पुणे, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. जक्कल यास गुरुवारी दुपारी शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्याची कोरोना तपासणी साठी घशातील स्वॅब प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. त्याला अचानक श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे बोपोडी येथील सी.सी.सी सेंटर मध्ये हलविण्यात आले होते . त्यांचा कोरोना तपासणी अहवाल ही प्रतीक्षेत होता. मात्र आपल्याला कोरोना झाला या भीतीनेच त्यांनी आत्महत्या केल्याच अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तसेच पोलिसांनी पंचनामा करून त्याचा मृतदेह य्वविच्छेदनासाठी पुढे पाठविण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पो निरीक्षक कोळी हे करीत आहे. तसेच स्थानिक नागरिकांकडून असे समजते की, याच वेळेस विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. तसेच सदर तरूणांने रुणालयाच्या मागिल बाजूस उडी मारली होती.

Tags:
Maharashtra