पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा पूर्ण बंद; शुक्रवारी कमी दाबाने होणार पाणीपुरवठा

पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा पूर्ण बंद; शुक्रवारी कमी दाबाने होणार पाणीपुरवठा


पुणे - गोखलेनगर येथील मॅपको टाकीच्या मुख्य जलवाहिनीला नवीन जोडणी करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने गुरुवार दिनांक ०४ जून २०२६ रोजी संबंधित टाकीच्या अखत्यारीतील सर्व परिसरात पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, शुक्रवार दिनांक ०५ जून २०२६ रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे. या कामामुळे शहरातील अनेक भागांना फटका बसणार असून नागरिकांनी आवश्यक ती पाण्याची साठवणूक करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पाणीपुरवठा बंद राहणारे प्रमुख भाग : एस.एन.डी.डी. (एच.एल.आर.) अंतर्गत गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ परिसर, लॉ कॉलेज रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, पौड रोड, शीला विहार कॉलनी, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी, सहवास सोसायटी, विठ्ठल मंदिर परिसर, गोसावी वस्ती, करिष्मा सोसायटी परिसर, बिग बाजार परिसर, डी.पी. रोडचा काही भाग, मयूर कॉलनी, कर्वे रोड ते शिवाजी पुतळा, दशभूजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत ते म्हात्रे पूल, भरतनगर, अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदिर, युको बँक कॉलनी, मंगेशकर हॉस्पिटल परिसर, वकिलनगर, वारजे परिसर आदी भागांचा समावेश आहे. तसेच, चतुःश्रृंगी टाकी परिसरातील औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, सकाळनगर, चव्हाणनगर, सिंध सोसायटी, औंधगाव परिसरातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook