ते म्हणाले, "चित्रपट हा मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. कोणत्याही चित्रपटाबाबत मतभिन्नता असल्यास ती लोकशाही मार्गाने आणि संवादातून व्यक्त करावी. वाद, बहिष्कार किंवा अनावश्यक तणाव निर्माण करण्याऐवजी कलाकृतीचा आशय समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे."
अभिजीत वाघमारे यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा ही विचारस्वातंत्र्य, सहिष्णुता आणि विविधतेचा स्वीकार करणारी आहे. त्यामुळे कलावंत, प्रेक्षक आणि समाज या सर्वांनी परस्परांचा आदर राखत विधायक भूमिका घेणे आवश्यक आहे.
शेवटी त्यांनी सर्व संबंधितांना संयम बाळगून कला, संस्कृती आणि समाजहित यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
— अभिजीत सिद्धार्थ वाघमारे
उपाध्यक्ष, पुणे शहर
चित्रपट व सांस्कृतिक विभाग
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार