पिंपरी : पिंपरी येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पीकअप व स्विफ्ट डिझायरचा विचित्र अपघात झाला. आज रविवार (दि.24) रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे तीनचाकी टेम्पो आणि कारच्या या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, जुना पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी दुपारी एक तीनचाकी टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Tags:
Maharashtra