मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्ह द्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्या दिल्या. तर 3 मेनंतर राज्यात काहीशी मोकळीक देणार असल्याचं सांगितलं. मात्र रेड झोन मध्ये असलेल्या शहरांना बंधन कायम असणार आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
तर मुंबई-पुण्यात कोरोनाचा आकडा का वाढत आहे याबाबतही उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले. पहिल्यांदा करोना व्हायरची लागण झालेले रुग्ण ज्या भागामध्ये सापडले, तिथे त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणखी काही जणांना बाधा झाली. कंटेनमेंट झोन जे आहेत, जे आपण सील केलेत तिथे करोना रुग्णांची संख्या वाढत आहे” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. करोनाच्या 75 टक्के रुग्णांणध्ये सौम्य, अतिसौम्य आणि लक्षणेच दिसत नसलेले रुग्ण आहेत. पण ते करोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांना सुद्धा आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात येत आहे.
तसेच करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी लॉकडाउनचा फायदा झाला असा दावा त्यांनी केला. “लॉकडाउन नसता तर कल्पना करु शकत नाही. करोना विषाणूचा गुणाकार होऊन रुग्ण संख्या वाढली असती. लॉकडाउनमुळे करोना विषाणूचा गुणाकार नियंत्रणात ठेवणे शक्य झाले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान आपण करोना व्हायरसची श्रृंखला तोडण्यात आपण यशस्वी झालो आहोत” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. “लॉकडाउनपेक्षा मी थोडा वेगळा शब्द वापरेन जो सिंगापूरच्या पंतप्रधानांनीही वापरला होता सर्किट ब्रेकर्स..अर्थात हे गतिरोधक आहेत. व्हायरसची श्रृंखला तोडण्यासाठी हे गतिरोधक आवश्यक आहेत” असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.