आज आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह
खडकी कॅन्टोन्मेंट भागातही दिवसेंदिवस कोरोना सक्रमणित रुग्ण रोज सापडत आहेत. दोन दिवसापुर्वी निता अपार्टमेंटमेंट मध्ये तब्बल 7 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यानंतर काल एक जण खडकीतील सुरती मोहोल्ला येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता, तर आज सुद्धा खडकीतील पाथरकर चाळ परिसरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. त्यामुळे खडकीकरांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे आतापर्यंत खडकीत एकूण 53 कोरोना बाधित रुग्ण झाले आहेत. त्यातील काही बरे होवून घरी गेले आहेत, तर काही बोर्डांच्या व अन्य रुग्णालयात उपचार घेत आहेत.
बोपोडी परिसरात लॉकडाउनच्या काळात जवळपास दिड महिना एकही रुग्ण सापडला नव्हता. परंतु, 2 मे रोजी एक महिला कोरोना बाधित आढळून आली होती. ती महिला उपचारानंतर बरी होऊनही आली .परंतु यानंतर मात्र रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. बोपोडी गावठाण सर्वे क्रमांक 25 व 26 मधील दोन रुग्ण सापडल्यानंतर त्यांच्यावर अनुक्रमे रुबी व कै. द्रौपदाबाई खेडेकर रुग्णालयात उपचार केले गेले. याच कालावधीत चिखलवाडी येथील एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता.
या सर्वांना बालेवाडी येथील निकमार उपचार केंद्रात पाठवण्यात आले होते. मात्र, यानंतर केवळ अठ्ठेचाळीस तासात जवळपास सत्तेचाळीस रुग्ण सापडल्याने या परिसरातील रुग्णांची वाढ झपाट्याने होतांना दिसून येत आहे. त्यातच काल नऊ नवीन रुग्ण सापडले होते. त्यामुळे हा आकडा 93 वर गेला होता. आज तब्बल 31 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळल्याने या परिसरातील रुग्णसंख्या ने शतक पार केले आहे.
प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून हा भाग पुर्णपणे सील करण्यात आला आहे. तसेच स्थानिक कार्यकर्ते, नगरसेवकांकडून खबरदारी बाबत जनजार्गती करण्याचे काम केले जात आहे. तसेच या भयानक परिस्थितीत घाबरून न जाण्याचे आवाहन यावेळी पोलिस, डॉक्टर, पुणे मनपा प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक आदी कडून करण्यात येत आहे.