टीव्ही पाहू न दिल्याने अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

टीव्ही पाहू न दिल्याने अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या


मुलगा सतत टीव्ही पाहत असल्याने त्याला टीव्ही पाहू नकोस असे आईने सांगितल्याने पुण्यात एका अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणाचा तपास बिबवेवाडी पोलीस करीत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, राकेश शिंदे (वय १४, रा. बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. बिबवेवाडी येथील राजीव गांधी नगर परिसरात राकेश हा त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. मंगळवारी दुपारच्या सुमारास राकेश टीव्ही पाहत बसला होता. त्यावेळी आईने कार्टून पाहू नकोस, म्हणून टीव्ही बंद केला आणि त्याला रागावली.

आई रागावल्याने राकेश घरातील वरच्या खोलीत जाऊन बसला. बराच वेळा झाला, राकेश खाली न आल्याने आईने वर जाऊन पाहिले असता राकेशने स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook