‘आयआरबी’कडून राज्यसरकारकडे ६ हजार ५०० कोटींचा पहिला हप्ता जमा

‘आयआरबी’कडून राज्यसरकारकडे ६ हजार ५०० कोटींचा पहिला हप्ता जमा


मुंबई : ‘यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गा’वरील पथकरवसुली अधिकारापोटी देय रकमेपैकी 6 हजार 500 कोटी रुपयांचा पहिला हप्ता ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीकडून आज राज्य सरकारला प्रदान करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमएसआरडीसी आणि राज्य सरकारच्यावतीने मंत्रालयात याचा औपचारिक स्वीकार केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे), नगरविकास तथा सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव अजोय मेहता, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर, स्टेट बँक आणि युनियन बँकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook