सावधान! बोपोडी रेड झोनच्या मार्गावर, बोपोडीत आता पर्यंत 72 कोरोना बाधित रुग्ण

सावधान! बोपोडी रेड झोनच्या मार्गावर, बोपोडीत आता पर्यंत 72 कोरोना बाधित रुग्ण

पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण बाएत आहेत. आता लॉकडाऊन उघडले आहे त्यामुळे नागरिक रसत्यावर उतर आहेत. तयमुळे अधिकच कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता तज्ञांकडून करण्यात येत आहे.
अशीच काहीशी परिस्थिती बोपोडी भागात आहे. एक सप्ताह पुर्वी बोपोडी हा परिसर ग्रीन झोन मध्ये होता. परंतु बोपोडी भागात ही दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. एक सप्ताह पुर्वी बोपोडी भागात फक्त 5 रुग्ण होते. ती संख्या प्रथम 11 झाली मग 2 जून रोजी हा आकडा वाढत 25 झाला आणि बोपोडी परिसर ग्रीन झोन मधून काढून पुणे महानगरपालिकाने बोपोडीचा कन्टेनम्ेंट झोन समावेश केला. आता तर 48 तासात चक्क 47 कोरोना रुग्ण बोपोडी परिसरात सापडले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना होम कॉरटांईन करण्यात आले आहे. तसेच आज ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहे त्याभागात पुणे महानगरपालिकेची टीमने आज घरोघरी जावून सर्व्हे करण्यास सुरुवात केली आहे. स. नंबर 24, 25 आणि 26 मध्ये दाट लोकवस्ती आहे. आणि याच भागात कोरोना आपले पाय पसरवित आहे. आता सद्य स्तिथीला बोपोडी एकूण 72 रुग्ण कोरोना बाधित झाले असून ते उपचार घेत आहे. वेळीच जर नागरिक सावध झाले नाही तर कोरोनाचे हॉटस्पाट ठीकाण होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे घरीच रहा आणि शासनाने दिलेल्या नियमाचे पालन केपे नाही तर. बोपेडी भागात कोरोनाचे ऐवढे रुग्ण सापडत असताना देखील स्थानिक नागरिक याबाबत गंभीर असलेले दिसत नाहीत. भाजी मार्केट तसेच अन्य दुकानात गर्दी दिसते आणि सुरक्षित अंतरही दिसत नाही. घरीच रहा सुरक्षित रहा!
SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook