मुंबई | आपल्या गोड आवाजने रसिकांच्या मनावर राज्य करणारी क्युट गायिका कार्तिकी गायकवाड आता आयुष्याची दुसरी इनिंग खेळण्यास तयार झाली आहे. 26 जुलै रोजी रोनित पिसे या तरूणाशी तिचा साखरपुडा होतो आहे.
‘सारेगमप’ या संगीत रिअॅलिटी शो मधून कार्तिकी आपल्या आवाजाच्या जोरावर घराघरात पोहचली. ‘घागर घेऊन… घागर घेऊन’ या गवळीनेने तर ती तुफान लोकप्रिय झाली. या गाण्याची गायिका म्हणून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. मग तिने मागे वळून पाहिलंच नाही.
नुकताच तिचा पाहण्याचा कार्यक्रम पार पडला आहे. रोनित हा पेशाने इंजिनिअर आहे तसंच त्यांचा स्वत:चा व्यवसाय देखील आहे. कार्तिकीचे बाबा कल्याण गायकवाड यांच्या मित्रपरिवातील पिसे कुटुंब आहे. तसंच हा महत्त्वाचा निर्णय माझ्या बाबांनीच घेतला असल्याचं कार्तिकीने आवर्जून सांगितलं.
26 जुलैला साखरपुडा आहे मात्र लग्नाची तारीख अद्याप ठरली नसल्याचं देखील कार्तिकीने सांगितलं आहे. तसंच तिच्या ‘सारेगमप’ मधल्या सहकारी गायक-गायिकांना ही बातमी सांगितल्यावर त्यांना खूप आनंद झाल्याचंही कार्तिकीने सांगितलं.