सोशल मीडियातील प्रमुख अँप असलेल्या फेसबुकने आता आणखीन एक नवीन फिचर आणले आहे. या फिचरचे नाव अवतार असे आहे. या फिचरमुळे आपण गेल्या काही दिवसापासून फेसबूकवर व्हर्च्युअल कार्टून किंवा अॅनिमेटेड कॅरॅक्टर असलेलं फोटो पाहत आहोत. हा एकंदरीत अँप काय आहे ते जाणून घेऊयात
‘अवतार’ नावाचे नवीन फीचर फेसबुक अॅपच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये समाविष्ट केले गेले आहे. आता बरेच लोक याच्या मदतीने स्वत: चे नवीन व्हर्जन डिझाइन करीत आहेत. आपण फेसबुकद्वारे तयार केलेला हा ‘अवतार’ स्टिकर म्हणून चॅट्समध्ये आणि कमेंट्समध्ये शेअर करू शकता. सध्या लॉक डाऊनमुळे देशात इंटरनेटचा वापर वाढला आहे, त्यामुळे फेसबुकने हे नवीन फीचर सादर केले आहे.हे नवीन ‘अवतार’ फीचर खास भारतीय वापरकर्त्यांसाठी तयार केले आहे. यामध्ये अनेक चेहरे, केशरचना आणि पोशाखांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एकदा का तुम्ही तुमचा ‘अवतार’ तयार केला, की, वापरकर्ते त्यांचा चेहरा स्टिकर म्हणून मेसेंजरवर किंवा कमेंट्समध्ये वापरू शकतील.
दरम्यान फेसबुकने प्रथम ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील वापरकर्त्यांसाठी हे फीचर सादर केले होते, त्यानंतर युरोप आणि अमेरिकेत याची सुरूवात झाली. मेसेंजरमध्ये अवतारची निर्मिती सध्या केवळ Android वर उपलब्ध आहे, परंतु लवकरच ती iOS वरही आणली जाईल.
असा अँप वापरता येईल…
- फेसबुक किंवा मेसेंजर उघडा.
- कमेंट ऑप्शनवर जाऊन Smiley बटण टॅप करा
- स्टिकर्सचा टॅब निवडा
- इथे तुम्हाला Create Your Avatar चा पर्याय मिळेल.
- येथे आपण आपला व्हर्च्युअल अवतार तयार करू शकता.
- आपला चेहरा पाहण्याची आवश्यकता असल्यास आपण वरच्या उजव्या बाजूला असलेल्या ‘मिरर’ चिन्हावर टॅप करू शकता.
- फेसबुक अॅप मधील बुकमार्क विभागात ‘Avatar Creator’ शोधा.
- अवतार तयार झाल्यानंतर आपल्याकडे सेव्ह व शेअर करू शकता.